आपल्या ह्या छोट्याश्या आयुष्यात प्रतेकाला कोणी ना कोणी आवडत असतो........ मग तो ओळखीचा असो वा आनोळखी ..... असो ती व्यक्ती आपल्याला हवी - हवीशी वाटत असते ... त्याच्याकडे / तिच्याकडे तास न तास बघत राहावेसे वाटते ........ आणि हळूच मनात विचार येतात... .....................आता तरी बोल................

Tuesday, July 6, 2010

●● थोडस हसायच आणी भरूपुर जगायचय ●●

आपण ह्या पावसातच भेटलो होतो ,
एकमेकान कडे पाहून थोडेसे हसलो होतो •·


आपल्या मित्रणा बाजूला सारून ,
आपणच एकमेकांत गुंतलो होतो •·


तेवढ्यात तुझी छत्री उडाली ,
ती पकडण्यासाठी तू देखील प्ळालिस •·


मग आपण खूप भीजलो ,
छत्री बंद करून असेच फीरलो •·


हा पाउस पाहीला की ,
तो दीवस आठवतो , थोडे पाणी ह्या पापण्यात साठवतो •·


या वर्षी देखील पाउस आहे ,
आणी छत्रीत मी एकट्याला पाहे •·


ह्या पावसात आपण परत भेटायाच ,
थोडस हसायच आणी भरूपुर जगायचय •·

Monday, February 1, 2010

·٠•●● दुख:त सारे विसरून जारे ●●•٠·

आकाशातले तारे तोडून देऊ ,
र्हुदयातल्या शंका जोडुन देऊ,
अस प्रियकर प्रियासी ला म्हणाला
●●•٠·

इतक सोप्प असत तारे तोडन ,
तर सार जग तू आणल असतस,
र्हुदयातल्या शंका काय ,
तू तर माझ्या हृदयाला जाणल असत
●●•٠·

कित्ति गोड हसली अन् म्हणाली प्रेयसी.
तुझी खोड करायला मला गम्मत् वाटली.
तो देखील हसला अन तिच्या जवळ बसला,
दोघनि एकमेकान कडे पाहून डोळ्यातच विचार केला
●●•٠·

कित्ति गोड होता तो क्षण ,
असेच राहीले असते दोघे जन ,
पण नियतीला ते नव्हत् मान्या,
प्रेम कराव हे तिच्या कुटुंबाला होत अमान्या
●●•٠·

आज कित्ति वर्ष झाली,
तो एकटाच आहे,
त्याच्या सुंदर प्रेमाला ,
तो आज विसरू पाहे
●●•٠·

एकदाच रड ,एकदाच विचार कर,
एकदाच काय ह्या अग्निला वीझउन जारे
दुख:त सारे विसरून जारे
●●•٠·



Thursday, January 28, 2010

·٠•●● सुखद क्षणाचा असतो फ्क्त काही काळ वास.●●•٠·

सुखद क्षण कसे लगेच निघून गेले ,
तळहातावर साचणार्‍या पाण्या सारखे काही काळच राहीले ●●•٠·

आस्वाद घेण्या आधीच मन निरागस केले ,
आयुष्यातल्या अनेक दु:खासाठी वाटा मोकळे करून गेले ●●•٠·

घाबरले हे मन अन हळूवार स्तब्ध झाले ,
तिच्या सुखद विचारात ते अचानक गुंतून गेले ●●•٠·

मग नाही आठवल ते दुःख ,आणि तो जीव घेणा प्रवास ,
पण सुखद क्षणाचा असतो फ्क्त काही काळ वास ●●•٠·

Sunday, February 1, 2009

एकदा मागे वळून पहा त्या आठवणिना चाळून पहा

आज पुस्तक पाहताना त्यात एक पुस्तक सापडल,
ते पुस्तक उघडल्यावर त्यात तुज़ नाव आढळल ,

ते आठवल जेव्हा मला तू पुस्तक दिल होत ,
आणि ते जपून ठेव अस मला संगितल होत ,

काळाच्या भोवर्यात हरवल ते आज सापडल ,
आता कळल आपल ते भांडण कित्ति महाग पडल ,

मी हरलो,चुकलो तर तू का नाही मला सवरल,
ह्या अनोळखी जगात तू मला एकट का डावरल ,

एवढा क्कचा धागा होता की तो लगेच तुटला ,
तुला सवरण्या साठी तू मैत्रीचा प्राण मुकला ,

आपल्या नात्याचा धागा पुन्हा एकदा ओवून पहा ,
एकदा मागे वळून पहा , त्या आठवणिना चाळून पहा.

Friday, June 13, 2008

·٠•●● दर वेळी मीच हाक मारावि ●●•٠·


दर वेळी मीच हाक मारावि,
आणि तुझि विचारपूस करावी●●•٠·

तुझ्याशि प्रेमाने बोलून,
आपली मैत्री वाढवावी●●•٠·

त्यावर तू उलट उत्तर द्यायची,
रोज रोज काय असे म्हणायची●●•٠·

माझ्यावर रागावयची,
आणि बोलन बंद करायची●●•٠·

मी तुझि विनवणी करावी,
मैत्री ची वचने आठउन द्यावी●●•٠·

घरच्या बाहेर जाताना,
तू माझ्या समोर यावी,
आणि दर वेळी मीच हाक मारावि●●•٠·

Thursday, April 24, 2008

रागवायच नव्हत...


रागवायच नव्हत...

ती नाही म्हणाली तरी रागवायच नव्हत,

तिच्या स्वप्नातच मला रमायच होत....

नको हव होत ते प्रेम आणि ती बंधन ,

हव होत फक्त नितळ मैत्रीचे संबंध....

तिच्यात गुंतून राहायच नव्हत मला,

पण तिला वाटायच मी गुंतवतोय तिला....

म्हणून ती लांब राहायची बोलत नव्हती जास्त,

आपण दोघे जवळचे मैत्र अशीच म्हणायची मात्र....

तिला बोलायच असायच पण नाही बोलायची ,

वाढेल आमची मैत्री असा विचार करायची....

रुसलिय माझ्यावर ,बोलन केलय बंद,

कोमेजलेल्या गुलाबा परी,मैत्रीचा उडालाय रंग....

काही झाल तरी तिला शब्दात जागवायच होत,

ती रागवली तरी मला रागवायच नव्हत....