आपल्या ह्या छोट्याश्या आयुष्यात प्रतेकाला कोणी ना कोणी आवडत असतो........ मग तो ओळखीचा असो वा आनोळखी ..... असो ती व्यक्ती आपल्याला हवी - हवीशी वाटत असते ... त्याच्याकडे / तिच्याकडे तास न तास बघत राहावेसे वाटते ........ आणि हळूच मनात विचार येतात... .....................आता तरी बोल................

Thursday, April 24, 2008

रागवायच नव्हत...


रागवायच नव्हत...

ती नाही म्हणाली तरी रागवायच नव्हत,

तिच्या स्वप्नातच मला रमायच होत....

नको हव होत ते प्रेम आणि ती बंधन ,

हव होत फक्त नितळ मैत्रीचे संबंध....

तिच्यात गुंतून राहायच नव्हत मला,

पण तिला वाटायच मी गुंतवतोय तिला....

म्हणून ती लांब राहायची बोलत नव्हती जास्त,

आपण दोघे जवळचे मैत्र अशीच म्हणायची मात्र....

तिला बोलायच असायच पण नाही बोलायची ,

वाढेल आमची मैत्री असा विचार करायची....

रुसलिय माझ्यावर ,बोलन केलय बंद,

कोमेजलेल्या गुलाबा परी,मैत्रीचा उडालाय रंग....

काही झाल तरी तिला शब्दात जागवायच होत,

ती रागवली तरी मला रागवायच नव्हत....